शहरीकरणासाठी वाळू आवश्यकच आहे. वाळूचे दरही नियंत्रणात राहणे आवाक्यातील घरांसाठी आवश्यक, तर दुसरीकडे सरकारी महसूल बुडता कामा नये. अशी कसरत सुरू असतानाच वाळू तस्करी आणि त्या आडून चालणाऱ्या गुन्हेगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. सरकारी अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करण्यापर्यंत मजल गेली आहे.
अंबड तालुक्यातील शहागड येथील
अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांकडून होणारे हल्ले वाढले आहेत. वाळू उत्खननातून अल्पावधीत अमाप पैसा मिळत असल्याने गावातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात या व्यवसायात उतरला आहे. वाळू उपसा करण्यासाठी सर्व सरकारी नियम पायदळी तुडवून दिवसरात्र वाळूचा उपसा सुरू आहे. वाळू तस्करांनी त्यांची स्वतःची यंत्रणाही तयार केली असून ही यंत्रणाच आता महसूलच्या जीवावर उठली आहे. या लढाईत महसूल यंत्रणा मात्र हतबल झाल्याचे दिसत आहे.
राज्यातील शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे बांधकामासाठी वाळूची मागणी वाढली आहे. त्यासाठी लहान मोठ्या नद्यांच्या पात्रातून अमर्यादपणे वाळूचा उपसा होत आहे. पूर्वी गावातील छोट्या मोठ्या बांधकामांपर्यंत मर्यादीत असणारी वाळूची मागणी प्रचंड वाढली आहे. या व्यवसायात अत्याधुनिक यंत्रांनी शिरकाव केला आहे. जेसीबी, अशा यंत्रांच्या मदतीने नदीपात्रातील वाळू उपसून शहरांकडे पाठवली जात आहे.
या वाळू उपशास आळा घालण्यासाठी सरकारने कडक नियम केले आहेत. परंतु, या नियमांची अंमलबजावणी होत नाही. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच वाळूचा उपसा करण्याचा नियम असला तरी रात्रीच्या वेळेसच वाळूचा उपसा होत आहे. नदीपात्रात वाहने उभी करुन त्यात वाळू भरून गुपचूपपणे गावाच्या बाहेर काढून दिली जातात. या वाळू उपशावर कारवाईसाठी महसूल विभागातील तहसीलदारांचे पथक कार्यरत आहे. परंतु या पथकावर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. कारवाईसाठी आलेल्या
, मारहाण करणे यांसारखे प्रकार सातत्याने घडत आहे. जालना जिल्ह्यासह गेवराई ,शहागड या भागात अशा घटना घडत आहेत. नदीपात्रातून चोरट्या मार्गाने वाळूचा उपसा करायचा. काही काळ ही वाळू साठवायची नंतर जादा दराने वाळूची विक्री करुन अमाप पैसे मिळवायचे. असा धंदा सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे या मार्गात अडथळा ठरणाऱ्या महसूल विभागाच्या पथकांवर हल्ले करुन त्यांच्यावर दडपण आणण्याचे प्रकार होत आहेत. अंबड तालुक्यातील शहागड, कुरण,साष्टपिपळगाव, गोंदी या तालुक्यातील गोदावरी, या नदीपात्रातून वाळू उपसा केला जातो. अवैधपणे होत असलेल्या या वाळू उपशाची माहिती गावातील महसूल विभागाचे अधिकारी, पोलिस यांना असते. माहिती असेल तर त्याकडे दुर्लक्ष का केले जाते ? पोलिस यंत्रणा काय करत असते? गावातून वाहने बाहेर कशी सोडली जातात? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्यानंतर महसूल पथकाकडून कारवाई झालीच तर वाळूची वाहने ताब्यात घेणे, जिलेटीनच्या मदतीने स्फोट करुन वाळूचा उपसा करणारी बोट उडवणे, यंत्रसामग्री जप्त करणे अशी कारवाई होते. या जप्त केलेल्या वाहनांचा दंड संबंधितांनी भरल्यानंतर ही वाहने पुन्हा सोडून दिली जातात. या कारवाईनंतर तरी वाळू उपशास आळा बसेल असे अपेक्षित असले तरी तसे मात्र झालेले नाही. वाळूचा उपसा वाढतच आहे.
या वाळू तस्करांना आवरणार तरी कोण