लागणार आहे. उबर इट्सवरील ग्राहक झोमॅटोकडे वळवण्यात येणार आहे. उबर इट्सकडे सध्या जे कर्मचारी आहेत, ते मात्र झोमॅटोकडे जाणार नाहीत. सध्या उबर इट्सकडे १०० कर्मचारी आहेत. यापैकी काही जणांना कामावरून काढून टाकले जाईल तर काही जणांना उबरच्या इतर सेवांमध्ये सामावून घेतले जाईल. याविषयी झोमॅटोने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल म्हणाले, उत्कृष्ट हॉटेलची माहिती ग्राहकांना पुरवण्याचे आणि पाचशेहून अधिक शहरांमध्ये फूड डिलिव्हरीचे काम आम्ही करतो आहोत. आता उबर इट्स आमच्याकडे आल्यामुळे या क्षेत्रातील आमचे स्थान अधिक बळकट करण्यास मदत होणार आहे. मुंबई : ऑनलाईन खाद्य पदार्थ डिलिव्हर करणार्या झोमॅटोने उबर इट्स इंडिया या कंपनीला विकत घेतले आहे. झोमॅटोने उबर इट्सला ३५ करोड डॉलर म्हणजे २५०० करोड रूपयांना खरेदी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उबरकडे सध्या फक्त ९.९ ।। टक्के शेअर आहे. कॅब सर्व्हिस देणारी उबर कंपनी ऑनलाईन खाद्यपदार्थ सर्व्हिसमध्ये चांगला व्यवसाय होत नव्हता, त्यामुळेच कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. बर्याच काळापासून याची चर्चाही सुरू होती. उबर इट्स आणि झोमॅटो या दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या व्यवहारानुसार उबर इट्सचे स्वतंत्र अस्तित्त्व संपुष्टात येणार आहे. त्याचबरोबर उबर इट्सला आपल्या सर्व ग्राहकांचा डेटा झोमॅटोला हस्तांतरित करावा.
उबर इट्स भारतात बंद