पुणे महानगरपालिकेचे कामगार कल्याण प्रमुख शिवाजी दौंडकर, नितीन केंजळेसह प्रभारी उपकामगार अधिकारी यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल होणार? -1

पुणे : भारताच्या संविधानामध्ये सर्व नागरिकांना सर्व ठिकाणी काम करण्याचा व केलेल्या कामाचा योग्य मोबदला घेण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु, पुण्यासारख्या शिक्षणाचे माहेर घर असणा-या व अतिशय जागरूक, उच्चशिक्षित, उच्चभ्रु, अतिशय जुनी व नावाजलेली संस्कृती असलेले, भारतामध्ये राहण्यासाठी योग्य ७ क्रमांकावर असलेले, आयटीहब असलेले, होवू घातलेले डिजिटल पुणे, लवकरच मेट्रोपॉलीटीन सिटीकडे वाटचाल करत असलेले पुणे, ६० लाखाच्या पुढे लोकसंख्या असलेले पुणे, अतिशय झपाट्याने प्रगतीकडे वाटचाल करत असलेल्या पुण्यामधील पुणे महानरपालिकेमध्ये अनेक कामगार हे अतिशय घाणीत, कष्टाचे, हालाखीचे काम करत आहेत. या कामामध्ये जास्तीत जास्त कामगार हे मागासवर्गीय आहेत. हे कामगार झाडणकाम, सुरक्षा, उद्यान, व्हेईकल डेपो, क्षेत्रिय कार्यालये, पाणीपुरवठा, आरोग्य, घनकचरा व इत्यादी यासारख्या विभागामध्ये हे मागासवर्गीय कामगार कंत्राटी स्वरूपात, रोजंदारी स्वरूपात, तासावर इत्यादी प्रकाराची कामे करत आहेत. ही कामे करत असताना या कामगारांना किती वेतन द्यावे, कसे वेतन द्यावे, वेतन देतानाचे अटी-शर्तीचे स्वरूप, टेंडरच्या कामाचे स्वरूप, ठेकेदारांच्या कामाचे स्वरूप, खात्याने करावयाच्या कामाचे स्वरूप, कामगारांनी काम केल्यानंतर त्यांना मिळणारा मोबदला वेतन स्वरूपात देणे, ईएसआय व ईपीएफ वजा करून संबंधित प्राधिकरणाक्डे भरल्याची खातरजमा करणे, कामगार कल्याण निधी भरल्याची खातरजमा करणे, किमान वेतन अधिनियमानुसार व कामगार कल्याण विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार ठेकेदाराने कामगारांना विहित सुविधा दिलेल्या आहेत अगर कसे? तसेच इत्यादी बाबींची तपासणी करून बिल अदा करावयाची कामे कामगार कल्याण विभाग करत आहे.